
India has Chance to Forgot 25 Years old Defeat: आज चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध लढणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर दुपारी २.३० वाजता हा फायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. याआधी भारत व न्यूझीलंड संघ २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला ४ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्यावेळीचे दु:ख विसरण्याची आज भारतीय संघाकडे संधी आहे.