
भारत आणि इंग्लंड संघात रविवारी (९ फेब्रुवारी) वनडे मलिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. कटकमधील बाराबाती स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताकडून शुभमन गिलच्या क्षेत्ररक्षकाने सर्वांचे लक्ष वेधले.
तसेच गोलंदाजी रवींद्र जडेजानेही पुन्हा चमकदार कामगिरी केली आहे. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी कामगिरी सुधारत भारतासमोर ३०५ धावांचं मोठे लक्ष्य ठेवले आहे.