तारीख पे तारीख! इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या घोषणेचा मुहूर्त पुढे ढकलला, Guatam Gambhir च्या डोक्यात काय शिजतंय?

India Test Squad announcement update: भारतीय कसोटी संघाला जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.
Team India
Team IndiaSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. २० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता या मालिकेसाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

त्यातच या मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन अनुभवी खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्याआधीच आर अश्विननेही २०२४ च्या अखेरीस कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

Team India
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर; ईश्वरनच्या हाती कर्णधारपदाची धुरा, तर 'या' धुरंदर खेळाडूचं पुनरागमन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com