IND vs NZ ODI Squad: शुभमन, गौतम, प्रग्यान यांच्यात हैदराबादमध्ये मिटींग; वन डे संघाच्या घोषणेची वेळ ठरली; मोहम्मद शमीबाबत...

When will India announce ODI squad for New Zealand tour 2026? भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आगामी वन डे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ कधी जाहीर होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
India vs New Zealand ODI

India vs New Zealand ODI squad announcement latest news

esakal

Updated on: 

India vs New Zealand ODI squad announcement latest news: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे आणि अजूनही टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. अजित आगरकर याचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीच्या प्रमुखपदी कोण, हाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बीसीसीआयने त्यासाठी अर्ज मागवले आहेत आणि तोपर्यंत निवड समिती सदस्य प्रग्यान ओझा हा अंतरिम प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतोय. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातली वन डे मालिका संपण्याची निवड समिती वाट पाहत होती आणि ती मालिका संपूनही बरेच दिवस उलटले. तरीही न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघ अद्याप जाहीर झालेला नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार येत्या २-३ दिवसांत वन डे संघ जाहीर होणार आहे. पण, यात कुणाला संधी मिळेल, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com