Jasprit Bumrah fitness update ahead of New Zealand tour
esakal
Why Jasprit Bumrah may miss India vs New Zealand ODI series? न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या वन डे संघाच्या घोषणेची वेळ जवळ येत असताना नवनवीन अपडेट्स हाती येत आहेत. मोहम्मद शमीचे वन डे संघात पुनरागमन होणार का, हा प्रश्न अनुत्तरीत असताना प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र वन डे संघाचा भाग नसेल, हे वृत्त येऊन धडकले आहे. IND vs NZ वन डे मालिकेसाठी येत्या २-३ दिवसांत संघ जाहीर होईल आणि त्यासाठी अंतरिम निवड समिती प्रमुख प्रग्यान ओझाने बुधवारी कर्णधार शुभमन गिल व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली. काही महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.