

IND vs PAK
esakal
India vs Pakistan Tri Series: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन संघांमधील सामना म्हटलं की तो कोणत्याही फायनल सामन्यापेक्षा कमी नसतो.
त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ लवकरच एका तिरंगी मालिका किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.