Rohit Sharma stands with Indian Army: पाकिस्तानला भारतीय जवानांनी दिलेल्या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराट कोहली व रोहित शर्मा या भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गजांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून भारतीय जवानांचे आभार मानले आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचा भारतावरील भ्याड हल्ला यशस्वीरित्या निष्फळ करून त्यांनी केलेल्या दृढनिश्चयाचे त्यांनी कौतुक केले आहे. संकटाच्या काळात देशासाठी उभे राहिल्याबद्दल भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा त्यांना अभिमान आहे असे रोहित शर्मा म्हणाला आहे. त्याचवेळी विराट कोहलीनेही भारतीय जवानांना कडक सॅल्यूट केला आहे.