
India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (१२ जानेवारी) अहमदाबादला खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकलेले असल्याने मालिकेतही ते २-० अशा विजयी आघाडीवर आहेत.
दरम्यान आता तिसरा सामना हा मालिकेचा निकाल बदलणारा नसला, तरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेपूर्वी होणारा दोन्ही संघांचा अखेरचा वनडे सामना आहे. त्यामुळे सामन्यातून दोन्ही संघ काही प्रयोग करण्याचीही शक्यता आहे.