IND vs NZ Squad Updates: श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, इशान किशन-रोहित शर्मा ओपनिंग जोडी; न्यूझीलंड दौऱ्यावर पाहायला मिळेल नवी टीम...

Shreyas Iyer likely to captain India against New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
India vs New Zealand 4th and 5th ODI squad updates

India vs New Zealand 4th and 5th ODI squad updates

esakal

Updated on: 

India vs New Zealand 4th and 5th ODI squad updates: भारतीय संघ येत्या २८ ऑक्टोबरला न्यूझीलंड दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी रवाना होणार आहे. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे आणि १५ नोव्हेंबरला शेवटचा सामना होईल. पण, चार दिवसांतच भारताला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे कसोटी संघातील काही प्रमुख खेळाडूंना वन डे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. कर्णधार शुभमन गिल, लोकेश राहुल आदी खेळाडू चौथ्या व पाचव्या वन डेत खेळणार नाही. त्यामुळे या सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे ( Shreyas Iyer) सोपवली जाईल, असा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com