India Probable Squad for New Zealand ODIs
esakal
India ODI squad vs New Zealand selection analysis: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वन डे सामन्यात शतक झळकावणाऱ्या ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) व यशस्वी जैस्वाल यांना वन डे संघातून वगळ्यात येण्याची चिन्हे आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी बरेच अनुमान लावले जात आहे आणि त्यापैकी एक ऋतुराज व यशस्वीला डच्चू मिळण्याचा अनुमान खरा होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय देशांतर्गत स्पर्धेत खेळून स्वतःची तंदुरुस्ती, फॉर्म सिद्ध करणाऱ्या मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) निवड समिती प्रमुख अजित आगरकर पुन्हा एकदा बाहेरच ठेवण्याची शक्यता आहे.