
Indian cricket squad surprises for Champions Trophy 2025 & England Series: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अपयशानंतर भारतीय संघ मूव्ह ऑन झाला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर नव्या दमाने उतरणार आहे. १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे, परंतु भारताचे सामने दुबईत खेळवले जातील. मात्र, त्याआधी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे १२ जानेवारीला या दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.