IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

Suryakumar Yadav Responds to Form Criticism: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची बॅट शांत राहिली. मागील तीन सामन्यांत १२, ५ आणि १२ अशा धावा करत त्याची कामगिरी चाहत्यांसाठी निराशाजनक ठरली. २०२५ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारची सरासरी केवळ १४.२ इतकी आहे.
Suryakumar Yadav responds to criticism after another low score

Suryakumar Yadav responds to criticism after another low score

esakal

Updated on

Suryakumar Yadav responds to criticism after another low score: भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुन्हा २-१ अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेला ११७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय संगाने १५.५ षटकांत ३ बाद १२० धावा केल्या. पण, याही सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव १२ धावांची खेळी करून माघारी परतला... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जवळ आला आहे आणि त्याआधी भारताच्या वाट्याला ८ सामने आहेत. त्यातही सूर्याचे अपयश ही संघाची मोठी चिंता बनली आहे. गेल्या वर्षभरात सूर्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १४.२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तरीही कर्णधार म्हणतोय, मी आऊट ऑफ फॉर्म नाही...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com