ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Shree Charani Becomes World No.1 T20I Bowler: भारतीय युवा फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर-1 गोलंदाज बनली. महिला टी-20 विश्वचषकातील तिच्या शानदार कामगिरीचे फळ तिला मिळाले.
Shree Charani Becomes World No.1 T20I Bowler

Shree Charani Becomes World No.1 T20I Bowler

esakal

Updated on

Shree Charani Becomes World No.1 T20I Bowler: सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाची युवा फिरकीपटू श्री चरणी(Sree Charani) हिने आपल्या शानदार गोलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या २१ वर्षीय खेळाडूने आता एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत श्री चरणी ही महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील नंबर-१ गोलंदाज बनली आहे. तिने इंग्लंडच्या लिंसी स्मिथला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com