India Squad for Sri Lanka : उत्सुकता शिगेला! भारतीय संघाची निवड होणार आज; कोणकोणत्या युवा खेळाडूंना मिळणार संधी?

India Squad for Sri Lanka Tour announcement today : श्रीलंकन संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असेल का?
India Squad for Sri Lanka Tour
India Squad for Sri Lanka Toursakal
Updated on

India Squad for Sri Lanka : भारत-श्रीलंका यांच्यामध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान टी-२० व एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड आज (ता. १८) होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

India Squad for Sri Lanka Tour
India squad vs SL : कर्णधार निवडीबाबत नवा ट्विस्ट! गौतम गंभीरची विनंती मान्य; श्रीलंका दौऱ्यावर हिटमॅन करणार टीमचे नेतृत्व

भारतीय संघ श्रीलंकन दौऱ्यात तीन टी-२० सामन्यांची, तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या तंदुरुस्तीवरून वारंवार प्रश्‍न निर्माण होत असल्यामुळे सूर्यकुमार यादवकडेही टी-२० संघाची धुरा सोपवण्यात येऊ शकते. प्रत्यक्षात कोणाच्या गळ्यात टी-२० संघाच्या नेतृत्वाची माळ पडते हे लवकरच समजेल.

India Squad for Sri Lanka Tour
Team India T20 Captain : पडद्यामागे नेमकं काय घडतंय? रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्याचा पत्ता कट? सूर्यादादा होणार टीम इंडिया कर्णधार

दरम्यान, भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा व निवड समिती सदस्य यांच्याशी संवाद साधल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीत गंभीर यांनी भारतीय संघाच्या भविष्याबाबत आपली मते व्यक्त केली. तसेच, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे खेळाडू संघामध्ये हवेत, याबाबतही गंभीर यांनी आपले मत व्यक्त केले.

India Squad for Sri Lanka Tour
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये ICCचे झाले इतके कोटींचे नुकसान, बैठकीपूर्वी मोठा खुलासा

श्रीलंकन संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असेल का? कोणकोणत्या युवा खेळाडूंना संधी देण्यात येईल? टी-२० सह एकदिवसीय मालिकेसाठी कोणाच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्यात येईल, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे टीम इंडियाची निवड झाल्यानंतर मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sri Lanka 14 member squad for second Test against India
Niroshan Dickwella Sonal Dinusha century partnership against India
Sri Lanka squad for 1st Test against India 2026
Team India players departs for Sri Lanka tour at the airport
Marathi News Esakal
www.esakal.com