India vs New Zealand 2026 ODI series Sqaud selection : न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी अपेक्षेपेक्षा काही काळ लांबलेली भारतीय संघाची निवड आज जाहीर होण्याची शक्यता आहे. अगोदर चर्चा झाल्यानुसार रिषभ पंतचे स्थान धोक्यात आहेच; मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ तारखेला होणार आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवणाऱ्या संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे; मात्र पुढच्या तयारीसाठी एक-दोन बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.