
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने झटपट क्रिकेट प्रकारात (वन डे व टी-२०) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिवसेंदिवस त्याच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत आहे. हाच धागा पकडून भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने म्हटले, की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर वरुण चक्रवर्तीमध्ये झालेला बदल वाखाणण्याजोगा ठरला आहे.