
Ranji Trophy 2025 MUMvs QF Marathi Updates: रणजी करंडक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरूवात झाली. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) रणजी करंडक स्पर्धेत खेळत असल्याने साऱ्यांचे लक्ष मुंबई विरुद्ध हरियाना या लढतीकडे होते. पण, अंशूल कंबोज व सुमित कुमार या जलदगती गोलंदाजांनी मुंबईचे कंबरडे मोडले. सूर्याचा फॉर्म रणजी करंडकमध्येही त्याच्यावर रुसलेला दिसला आणि तो ५ चेंडूंत २ चौकार मारून ९ धावांवर त्रिफळाचीत झाला. सूर्याची विकेट पाहून सर्वांनाच धक्का बसला, कारण त्याच्या पदलालित्यात ताळमेळच नव्हता. कर्णधार अजिंक्य रहाणेने काही काळ संघर्ष दाखवला, परंतु त्यालाही कंबोजने माघारी पाठवला. मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशाचा भार यावेळी शार्दूल ठाकूरलाही पेलवता आला नाही.