IND vs SL Test Squad: बुमराह, जडेजाचे पुनरागमन; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात बदल होणार, नेमकं काय होणार?

India Test squad for Sri Lanka 2026: श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता असून, संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेला रवाना होणार आहे.
India Test squad for Sri Lanka 2026

India Test squad for Sri Lanka 2026

esakal

Updated on

India squad for Sri Lanka Tests to be picked this week: भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंचा मोर्चा आता कसोटी मालिकेकडे वळला आहे... इंग्लंड दौऱ्यावरील अपयशानंतर टीम इंडियाची एक तुकडी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे, तर दुसरा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर ( IND vs SL ) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोर लावण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, दुखापतीचे ग्रहण याही संघावर कायम आहे आणि अशा परिस्थितीत कोणाला संधी मिळते, कोणाला नाही, याची उत्सुकता आहे. १५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com