भारत-इंग्लंड यांच्यात पाच ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका
भारतीय महिला संघ लॉर्ड्सवर प्रथमच कसोटी समाना खेळणार
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक
India will be touring England again next year : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि चौथी कसोटी कालपासूनच मँचेस्टर येथे सुरू झाली आहे. दरम्यान, याच कालावधीत भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यावर ट्वेंटी-२० व वन डे मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. आता भारताच्या पुढील इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) जाहीर केले आहे.