मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

India tour of Bangladesh called off : भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका आता स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की ही मालिका आता ऑगस्ट २०२५ ऐवजी सप्टेंबर २०२६ मध्ये खेळवली जाणार आहे.
INDIA VS BANGLADESH SERIES POSTPONED TO SEPTEMBER 2026
INDIA VS BANGLADESH SERIES POSTPONED TO SEPTEMBER 2026esakal
Updated on

India vs Bangladesh 2025 series postponed to 2026

भारताचा पुढील महिन्यातला बांगलादेश दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCCI) यांच्या संयुक्त निवेदनातून जाहीर करण्यात आले आहे. हा दौरा रद्द झाल्यामुळे विराट कोहली व रोहित शर्मा यांची सुट्टी लांबली आहे. कसोटी व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतलेले हे दोघं फक्त वन डे क्रिकेट खेळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com