भारताने इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी ६ धावांनी जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक माऱ्यामुळे इंग्लंडचा शेवटचा डाव कोसळला.
पाकिस्तानच्या माजी खेळाडू शब्बीर अहमद खानने टीम इंडियावर व्हॅसलीन वापरून बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप केला
Former Pakistan fast bowler Shabbir Ahmed Khan has stirred a controversy : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि ही कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी घातक गोलंदाजी केली. इंग्लंडच्या फलंदाजीची फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि भारताला ६ धावांनी विजय मिळवून दिला. पण, कसोटी मालिका संपल्यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने वादग्रस्त विधान केले आहे.