IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

IND vs AFG 1st ODI toss delayed due to rain: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वन डे सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना पावसाने चाहत्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
Rain clouds over Dharamsala forced a delay in the toss

Rain clouds over Dharamsala forced a delay in the toss

esakal

Updated on

BCCI update on India vs Afghanistan match: भारत-अफगाणिस्तान पहिला वन डे सामना विलंबाने सुरू होईल, हे सकाळ स्पोर्ट्सने आधीच्या वृत्तात सांगितले होते आणि तसेच होताना दिसत आहे. धर्मशाला येथे पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नाणेफेकीला विलंब होणार असल्याचे BCCI ने जाहीर केले. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच मालिकेतील प्रत्येक सामना भविष्याच्या संघबांधणीची चाचपणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com