India vs Australia 2nd ODI live streaming details 2025
esakal
Where to watch IND vs AUS 2nd ODI live in India: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात पराभव पत्करावा लागला. पर्थवर झालेल्या या सामन्यात भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली. रोहित शर्मा व विराट कोहली ( Rohit Sharma & Virat Kohli) यांचे २२४ दिवसांनी पुनरागमन निराशाजनक राहिले. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात त्यांच्यावर मोठी खेळी करण्याची आव्हान असेल. एडिलेडवरील या सामन्यात अपयशी ठरल्यास त्यांचे स्थान धोक्यात येऊ शकते.