

India vs Australia 3rd test Playing XI : रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे कर्णधार उद्या पहाटे नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे. ब्रिस्बनच्या गाबा मैदानावर रंगणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे आणि तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोघांचाही प्रयत्न असणार आहे. भारताने पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला, परंतु त्यानंतर डे नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. १० विकेट्सने ही मॅच जिंकून मालिका बरोबरीत आणली.