
Rohit Sharma’s Bold Statement Against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सिडनी कसोटी सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सला अनपेक्षित मुलाखत दिली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरून दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान बोलताना, रोहितने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यातून माघार का घेतली आणि त्याचा नेमक आर्थ काय लावायचा हे, स्पष्ट केले. रोहितने भारतीय संघातील कथित ड्रेसिंग रूम लीकबद्दल तपशीलवार सांगितले. यावेळी त्याने मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून होणाऱ्या स्लेजिंगवर भाष्य केले आणि यजमानांना ताकीद दिली.