

Australia vs India test cricket: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. पर्थला झालेला पहिला सामना पर्थ येथे २९५ धावांनी जिंकला. त्यानंतर ऍडलेडला दुसरा सामना झाला, जो ऑस्ट्रेलियाने तब्बल १० विकेट्सने जिंकला.
त्यानंतर आता तिसरा सामना अद्याप सुरू व्हायचा आहे. परंतु, त्याआधीच चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाची (बॉक्सिंग डे) तिकीटविक्री हाउसफुल झाली आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.