
Australia vs India 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यानंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा मैदानात १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, या कसोटीसाठी भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने महत्त्वाचा बदल सुचवला आहेत. तसेच त्याने हर्षित राणाला मात्र पाठिंबा दिला आहे.