

Women's World Cup Semifinal
sakal
जयेंद्र लोंढे
नवी मुंबई : यजमान भारतीय महिला क्रिकेट संघासमोर आज गुरुवारी एकदिवसीय विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीमध्ये गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असणार आहे. साखळी फेरीमध्ये सलग तीन लढतींमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष्य आठ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचण्याचे असले तरी हरमनप्रीत कौरच्या संघासमोर अडचणी अनेक आहेत.