INDIA TO TOUR BANGLADESH
esakal
India tour of Bangladesh white-ball series 2026 schedule : बांगलादेशात सध्या हिंसा भडकली आहे आणि तेथील हिंदूंची क्रूर हत्या होत असल्याच्या बातम्या रोज ऐकायला येत आहेत. मागच्या वर्षीही बांगलादेश पेटले होते, परंतु ते तेथील सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलन होते. पण, यावेळी तेथे हिंसा सुरू आहे आणि अशात बांगलादेशातील खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बंदी घालावी अशी मागणी होतेय. त्यातच भारतीय संघ आता बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB) भारताविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.