
India vs England 1st ODI Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला वन डे सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ४-१ अशी जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यानंतर होणारी ही वन डे मालिका दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण रोहित शर्मा व विराट कोहली यांचा फॉर्म चिंतेची बाबत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांना तो फॉर्म मिळवण्याची IND vs ENG मालिका शेवटची संधी आहे. त्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याचीही चाचपणी याच मालिकेतून होणार आहे.