Ajinkya Rahane’s predicted Playing XI for 1st Test vs England : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी त्याची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. एकीकडे ८ वर्षांनी करुण नायरच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा असताना अजिंक्यने पहिल्या कसोटीसाठीच्या प्लेइंग इलेव्हनमधून नायरला बाहेर बसवले आहे. त्याने अर्शदीप सिंग आणि साई सुदर्शन या दोन खेळाडूंच्या पदार्पणासाठी बॅटिंग केली आहे. त्याची ही प्लेइंग इलेव्हन पाहून सर्वांना जरा आश्चर्याचा धक्का बसला.