India vs England 1st Test set to begin in Leeds: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिली कसोटी मॅच आज खेळणार आहे. समोर इंग्लंडचा तगडा संघ आहे आणि त्यांना टीम इंडियाचे युवा शिलेदार भिडणार आहेत. लीड्समधील हेडिंग्ले येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या हंगामातील ही भारत आणि इंग्लंड यांची पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाने शुभारंभ करण्यासाठी सज्ज असणार आहेत.