India vs England, 2nd ODI: पराभवानंतर शुभमन गिलचा संताप! टीम इंडियाच्या या मोठ्या कमतरतेवर थेट बोट; नेमकं काय म्हणाला?

Shubman Gill post match press conference: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताचा ४ गडी राखून पराभव झाला. सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने मधल्या फळीची खराब कामगिरी, सतत विकेट गमावणे आणि वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे झालेला परिणाम स्पष्ट केला.
India vs England, 2nd ODI

India vs England, 2nd ODI

esakal

Updated on

SHUBMAN GILL REVEALS THE BIGGEST REASON: भारतीय संघ सध्या इंग्लंड (IND vs ENG)दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे.

त्यामुळे १९ जुलै रोजी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर २३४ धावांचे लक्ष्य ठेवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com