

Rohit Sharma Virat Kohli 400 matches together
esakal
Rohit Sharma and Virat Kohli Set Historic Milestone: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)यांच्यातील एकदिवसीय मालिका आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली असून, तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, मालिका आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा सामना रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहली यांच्यासाठीही खास ठरणार आहे, कारण या सामन्यात दोघे एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहेत.