
Team India Playing XI vs England Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-२० सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्या तीनपैकी दोन लढतीत विजय मिळवला आहे, परंतु इंग्लंडने तिसरी मॅच जिंकून मालिकेती आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे आजच्या लढतीत टीम इंडियाला मालिका विजयाची चव चाखता येतेय का याची उत्सुकता आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली मागील ट्वेंटी-२० मालिकांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आझच्या लढतीत टीम इंडियाचे लक्ष्य विजय मिळवून टी-२० मालिका खिशात घालण्याकडे असेल. पाहुणा जॉस बटलरचा इंग्लंडचा संघ २-२ अशी बरोबरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.