शार्दूल ठाकूरने चौथ्या कसोटीत केवळ ५ षटकं टाकल्यामुळे कर्णधार शुभमन गिलच्या निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
नितीश कुमार रेड्डी जखमी झाल्याने दोन सामन्यांनंतर शार्दूलचे संघात पुनरागमन झाले.
शार्दूलने फलंदाजीत ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Shardul Thakur on why he bowled only 5 overs in 4th Test : भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलच्या निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. शार्दूलने त्याला गोलंदाजीत पुन्हा एकदा कमी षटकं दिल्याल्याबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमार रेड्डी जखमी झाल्याने शार्दूलचे दोन सामन्यानंतर कसोटी संघात पुनरागमन झाले. पण, त्याला कालच्या दिवसाच्या खेळात फक्त ५ षटकं फेकायला दिली.