

India vs England 5th T20I Hardik Pandya to return as Team India’s T20I captain? भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा ट्वेंटी-२० सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने चौथी लढत जिंकून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिक आहे. पण, सूर्यासाठी तसं नाही.. कर्णधार म्हणून सूर्यकुमारने भारताला ट्वेंटी-२० मालिकेत पाठोपाठ मालिका जिंकून दिल्या आहेत, परंतु त्याची वैयक्तिक कामगिरी खराब झालेली आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध तो घरच्या मैदानावर मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला, तर तो कदाचित नेतृत्व सोडूही शकतो आणि अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याकडे पुन्हा नेतृत्व जाण्याचा अंदाज आहे.