Ind vs Eng Test Cricket : विराट थेट आयपीएल खेळणार ; पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर

भारत-इंग्लंड यांच्यामध्ये ७ ते ११ मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचे पुनरागमन झाले असून के. एल. राहुल याला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricket sakal

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड यांच्यामध्ये ७ ते ११ मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचे पुनरागमन झाले असून के. एल. राहुल याला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. विराट कोहली याही कसोटीसाठी उपलब्ध नसल्यामुळे आता तो थेट आयपीएल खेळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले की, बीसीसीआयची वैद्यकीय टीम के. एल. राहुलच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याच्या दुखापतीसाठी लंडनमधील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. यामुळे आता त्याला पाचव्या कसोटीत खेळता येणार नाही. दरम्यान, रांची येथील चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या बुमराचे पाचव्या कसोटीत पुनरागमन करण्यात आले आहे. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत आता पुन्हा एकदा पाटीदार याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण कसोटी मालिका आधीच जिंकल्यामुळे पडिक्कल याचे कसोटी पदार्पण होऊ शकते.

वॉशिंग्टन सुंदर रणजीत खेळणार

अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आता रणजी क्रिकेट करंडकाचा उपांत्य सामना खेळणार आहे. मुंबई-तमिळनाडू यांच्यामध्ये २ ते ६ मार्च यादरम्यान रणजी करंडकाचा उपांत्य सामना रंगणार आहे. या लढतीत तमिळनाडूचे प्रतिनिधीत्व करता यावे, यासाठी सुंदरला भारतीय संघातून सोडण्यात आले आहे. सुंदरसाठीही हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

Ind vs Eng Test Cricket
Pro Kabaddi : पहिल्या जेतेपदाची आस ; पुण्यासमोर आज हरियाणाचे आव्हान

पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेशकुमार, आकाशदीप.

वैयक्तिक कारणामुळे माघार

विराट कोहलीने वैयक्तिक कारण सांगून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमधून माघार घेतली होती; मात्र याबाबतचे कारण सांगण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वीच विराट - अनुष्का शर्मा या दाम्पत्याला पुत्ररत्न झाल्याचे सामाजिक माध्यमावरून सांगण्यात आले. विराटच्या सुट्टीचे नेमके कारण सर्वांना समजले. आता बीसीसीआयने पाचव्या कसोटीसाठीही संघ जाहीर केला. त्यामध्ये विराटचा समावेश नाही. याचा अर्थ आता तो थेट २२ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलमध्ये सहभागी होईल, अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com