शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांचे भारतीय क्रिकेटमधील पर्व सुरू झाले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांत युवा संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, रोहित व विराट यांची प्लेइंग इलेव्हनमधील जागा कोण घेणार? कोणाला संधी मिळणार? हे सर्व अजून ठरायचे आहे. सराव सामन्यात लोकेश राहुल, करुण नायर, ध्रुव जुरेल यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारताचे आघाडीचे सहा फलंदाज कोण असतील याची उत्सुकता आहे.