

IND vs ENG
esakal
Washington Sundar Ruled Out of 3rd ODI: शनिवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा निराशाजनक पराभव झाला. या पराभवानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आली असून आता अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर(Washington Sundar) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्याला मुकणार आहे.