
नॉटिंगहॅम : इंग्लंडमध्ये पुढील वर्षी (२०२६) महिलांच्या टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची रंगीत तालीम उद्यापासून (ता. २७) सुरू होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. या दोन देशांमध्ये पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. यापैकी पहिला सामना नॉटिंगहॅम येथे पार पडणार आहे.