India vs India A Closed-Door Match: No Media, No Broadcasting Allowed
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत आणि अभिमन्यू इश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत अ, अशा दोन संघांमध्ये आजपासून सराव सामन्याला सुरुवात झाली. दोन्ही संघ मैदानावर उतरले ते दंडावर काळी फित बांधून... अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना खेळाडूंना श्रद्धांजली वाहिली, एक मिनिटांचे मौन धरले गेले.. BCCI ने हे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, सामन्यात नेमकं काय सुरू आहे, याचा पत्ता त्यांनी कुणालाच लागू दिलेला नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातले दोन्ही सराव सामने लाईव्ह दाखवले गेले होते, परंतु हा सामना नाही. पण का?