Shardul Thakur scores unbeaten 122 in IND vs IND A match
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन सीनियर्सच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाची जबाबदारी शुभमनसह अनेक युवा खेळाडूंच्या खांद्यावर आहे. त्यांच्या मदतीला लोकेश राहुल, करुण नायर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा हे सीनियर खेळाडू आहेतच. या संघाला चांगला सराव मिळावा यासाठी भारत अ संघाविरुद्ध अडीच दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला आणि आता २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण, भारत आणि भारत अ यांच्यातल्या सराव सामन्यात कोण चमकले, कोण अपयशी ठरले, यावर लक्ष टाकायला हवं.