India vs New Zealand 1st T20I match time and live telecast
esakal
Where to watch India vs New Zealand T20I live? सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आपल्या तयारीची चाचपणी करायला मैदानावर उतरणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी भारताची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे. न्यूझीलंडने वन डे मालिकेत बाजी मारली असली तरी, भारत ट्वेंटी-२०त त्यांचे वर्चस्व दाखवण्यासाठी तयार आहेत. आजपासून या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत आणि त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.