IND vs NZ 3rd T20: भारतीय गोलंदाजांना डॅरेल मिचेल चांगलाच नडला! शतक हुकलं, मोठी धावसंख्या; भारतासमोर मालिकाविजयाचं आव्हान

IND VS NZ 3RD T20: भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात डॅरिल मिचेलने नाबाद ८९ धावांची खेळी केली. बेव्हन जेकब्सच्या नाबाद ३९ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ३ बाद १९८ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं लक्ष्य आहे.
IND vs NZ 3rd T20

IND vs NZ 3rd T20

esakal

Updated on: 

IND VS NZ 3RD T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सुरुवातीलाच अर्शदीप सिंगने विकेट मिळवून भारताला चांगली सुरुवात करून दिली.

मात्र, त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. डॅरिल मिचेलच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ३ बाद १९८ धावा केल्या. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी १९९ धावा कराव्या लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com