Champions Trophy 2025 Final Match offiials : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या फायनलची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ८ वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेतील ८ पैकी अव्वल दोन संघ, ते म्हणजे भारत व न्यूझीलंड... हे रविवारी जेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. भारतीय संघाने अ गटात न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली असली तरी किवींचा एकसंघपणा टीम इंडियाला कधीही भारी पडू शकतो. यापूर्वी किवींनी आयसीसी स्पर्धेच्या दोन फायनल्समध्ये भारताला हरवले आहे. त्यामुळे चाहत्यांची अधिक धाकधुक वाढली आहे. त्यात आयसीसीने या महत्त्वाच्या सामन्यासाठी सामनाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत आणि सर्व भारतीय ते एक नाव शोधतोय, ज्याला ते टीम इंडियासाठी पनौती म्हणत आहेत.