

India vs New Zealand ODI Series
esakal
सुनंदन लेले
वेलिंग्टन : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला त्यांच्याच देशामध्ये एकदिवसीय मालिकेत ३-१ असे पराभूत केले. दोन देशांमधील ही मालिका रोमहर्षक ठरली. ही मालिका आटोपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर व न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यांनी कौतुक करताना म्हटले की, टी-२० किंवा एकदिवसीय प्रकारात बहुतांशी वेळा धावांचा पाऊस पडतो, मात्र बॅट व बॉल यामधील द्वंद्व क्रिकेट या खेळाची रोमांचकता वाढवते. अशा प्रकारच्या मालिकांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचते.