IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

India vs New Zealand ODI squad selection latest updates: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड या आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे.
Gautam Gambhir on Hardik Pandya fitness

Gautam Gambhir on Hardik Pandya fitness

esakal

Updated on: 

India's ODI squad against New Zealand: भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने पुनरागमन वारंवार लांबणीवर पडत आहे. ३३ वर्षीय हार्दिकला सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे त्याला अनेक मालिकांना मुकावे लागले. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर त्याचे पुनरागमन शक्य दिसत नाही. अशात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पर्यायी खेळाडूची शोधाशोध सुरू केली आहे. मुंबईचा ऑल राऊंडर सूर्यांश शेडगे ( Suryansh Shedge ) याची वन डे संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com