IND vs NZ 5 match T20I series full schedule
esakal
Cricket
IND Vs NZ T20I : विराट,रोहित OUT; सूर्यकुमार यादव IN ! ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघात बदल, जाणून घ्या ५ सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
IND vs NZ 5 match T20I series full schedule: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आगामी T20 World Cupच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन नव्या संयोजनाची चाचपणी करत असल्याचं दिसून येत आहे.
India New Zealand T20I series fixtures and venues: न्यूझीलंडने वन डे मालिकेत २-१ असा विजय मिळवून भारतात इतिहास घडवला. आता भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेत या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि आगामी ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी मैदानावर उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने या मालिकेत खेळेल. वन डे मालिकेत खेळणारा संघ आणि आता ट्वेंटी-२० मालिकेसाठीचा संघ, यात बदल दिसणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन दिग्गज आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी भारताच्या ट्वेंटी-२० संघात युवा जोश पाहायला मिळतोय.
