India vs Pakistan Asian Games 2026 final
esakal
Asian Games 2026 India Pakistan final rain rules: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील क्रिकेटची फायनल शनिवारी जपानच्या निशीन शहरात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे आता सुवर्णपदकासाठी IND vs PAK असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारत या सामन्यात प्रबळ दावेदार मानला जातोय, परंतु जर पावसामुळे हा सामना होऊच शकला नाही, तर कोणाला गोल्ड मेडल दिले जाईल?